.दि पंढरपूर मर्चंटस बँकेकडून बाळासाहेब चव्हाण युवा उद्योजक म्हणून सन्मानित

IMG-20260316-WA0043.jpg

AJ 24taas news साठी धनंजय भोसले टेंभुर्णी प्रतिनिधी. जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल नंबर 9921581001

दि पंढरपूर मर्चंट्स बँक लिमिटेड पंढरपूर या बँकेने दिनांक 14/ 3/ 2026 रोजी
टेंभुर्णी येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण यांना युवा उद्योजक म्हणून पंढरपूर येथील म्हमाणे सभागृह येथे बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील, व्हा.चेअरमन विजयकुमार परदेशी, संचालक नागेश भोसले, सोमनाथ डोंबे, विजयकुमार कोठारी, बँक मॅनेजर एम एम दाळवाले, सौ भोसले, सौ गांधी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी या बँकेकडून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अंतर्गत त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात या बँकेकडून भाग भांडवल घेतले आहे. त्या भाग भांडवलाची योग्य रीतीने परतफेड केल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.
हा सन्मान मला दि. पंढरपूर मर्चंट बँकेकडून मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी एक प्रेरणादायी असून मला माझा व्यवसाय करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळाली व माझ्या व्यवसायामध्ये आज माझी जिद्द, चिकाटी व मेहनत कामी आल्याचे यावेळी बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.