शेतरस्ते प्रश्नावर सोलापुरात महत्त्वपूर्ण बैठक; प्रशासनाकडून तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

Screenshot_2026-04-28-20-17-00-08_7352322957d4404136654ef4adb64504.jpg

AJ 24taas news साठी टेंभुर्णी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर जाहिरात साठी संपर्क मोबाईल नंबर 9921581001

सोलापूर : शेतकरी शेतरस्ते या ज्वलंत प्रश्नावर आज सोलापूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस शेतकरी चळवळीचे समन्वयक मा. दादासाहेब जंगले पाटील तसेच कायदेविषयक सल्लागार मा. कडूस पाटील उपस्थित होते.

बैठकीमध्ये मा. उपजिल्हाधिकारी तथा महसूल विभाग आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या अधिकारी मा. अंजली मरोड यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या संयमाने ऐकून घेतल्या. अतिक्रमणग्रस्त शेतरस्ते, बंद झालेले पाणंद मार्ग तसेच विविध तालुक्यांतील प्रलंबित प्रकरणांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने घेत मरोड मॅडम यांनी बैठकीदरम्यानच संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले. तसेच सुरू असलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अतिक्रमण हटवून शेतरस्ते मोकळे करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

या बैठकीस बार्शी, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा व माढा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक यशस्वीपणे पार पडल्यानंतर उपस्थितांचे आभार सोलापूर जिल्हा समिती सदस्य मा. अनिल नागणे (उपरी, ता. पंढरपूर) यांनी मानले.