जयंतीतून समाजोपयोगी उपक्रम राबवा, हाच खरा महापुरुषांना अभिवादनाचा मार्ग” — पीआय अतुल मोहिते

Screenshot_2026-04-14-19-18-46-00_7352322957d4404136654ef4adb64504.jpg

कुर्डूवाडी महिलांसाठी मोफत कॉम्प्युटर कोर्सचा शुभारंभ

टेंभुर्णी/प्रतिनिधी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुर्डूवाडी येथे महिलांसाठी मोफत कॉम्प्युटर कोर्सचा शुभारंभ कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे पीआय अतुल मोहिते यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. जयंतीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत शिक्षण व कौशल्यविकासाला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमातूनच समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी बोलताना पीआय अतुल मोहिते यांनी, “जयंती साजरी करताना केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबवले, तरच महापुरुषांच्या विचारांना खरी दिशा मिळते,” असे सांगितले. त्यांनी इतर मंडळांनीही अशा उपक्रमांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुर्डूवाडी पंचायत समितीचे बीडीओ श्री महेश सुळे होते. यावेळी प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, श्री अमर कुमार माने, श्री चंद्रकांत वाघमारे, श्री भागवत देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले व महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

कॉम्प्युटर कोर्सची सविस्तर माहिती श्री रणजीत सुरवसे यांनी दिली. डिजिटल युगात महिलांनी तंत्रज्ञान आत्मसात करून स्वावलंबी बनावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला एपीआय श्री मुल्ला, श्री रावसाहेब पाटील, प्रा. डॉ. आशिष रजपूत, श्री नसीर शेख, श्री रविराज बागल, श्री सुधीर बागल, श्री गणेश बापू बागल, श्री लक्ष्मण तात्या बागल, श्री आबासाहेब घोलप, श्री वामन अण्णा बागल, श्री दादासाहेब चव्हाण, श्री मुकुंदजी अंधारे, श्री पप्पू तांबोळी, श्री योगेश रायपुरे, श्री त्रिशूल रजपूत, श्री आबा चौबे, श्री सुनील तात्या शिंदे, श्री अशोक ओहळ यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमोल रजपूत यांनी केले, तर आभार रोहन झिंगळे यांनी मानले. अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे महापुरुषांच्या विचारांची खरी अंमलबजावणी होत असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्याची हीच खरी दिशा असल्याचे या कार्यक्रमातून समजणे