टेंभुर्णी प्रतिनिधी Anil jagtap,AJ 24taas news Maharashtra जाहिरात साठी संपर्क मोबाईल नंबर 9921581001
टेंभुर्णी येथील करमाळा चौक परिसरातील मे. शिव बेकरी अॅण्ड पान शॉप येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून विक्री केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 30) केली.

या प्रकरणी रेणुका रमेश पाटील (वय 40), सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी फिर्याद दिली असून स्वप्निल दिलीप देशमुख (वय 38, रा. गव्हर्नमेंट हॉस्पिटलजवळ, देशमुख गल्ली, टेंभुर्णी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दि. 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान दुकानातून विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये मावा, दिल्लगी सुगंधित सुपारी, विमल पानमसाला, व्ही-1 सुगंधित तंबाखू, डायरेक्टर पानमसाला आणि आरएमडी पानमसाला असा एकूण 1 हजार 865 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
प्राथमिक तपासात आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थांचा साठा करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 312/2026 नोंद करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2)(i), 26(2)(ii), 26(2)(iv), 59 सह कलम 27(3)(e), 30(2)(a), नियमन 3.1.7, नियमन 2.3.4 तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 223, 274, 275 व 123 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि रोहित पवार करीत आहेत.





