दहिवली येथील कोयत्याने व गजाने हल्ला प्रकरणातील चार आरोपींना जामीन

Screenshot_2026-05-08-21-40-43-31_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

AJ 24taas news Maharashtra साठी टेंभुर्णी/ प्रतिनिधी धनंजय भोसले जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल नंबर 9921581001


टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कोयत्याने हल्ला व मारहाण प्रकरणातील चार आरोपींना माढा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, टेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 225/2026 मध्ये नामदेव ज्ञानेश्वर पाटील, एकनाथ ज्ञानेश्वर पाटील, सोपान उत्तम टोनपे व बाळाजी उर्फ श्रीराम उत्तम टोनपे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ॲड. अजिंक्य संगीतराव

फिर्यादी संदेश विठ्ठल जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील जुन्या वादातून आरोपींनी लोखंडी गज, काठी व कोयत्याने हल्ला करून मारहाण व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सदर प्रकरणात आरोपींनी मा. न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने तपासातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे, कथित शस्त्रे जप्त झाल्याचे तसेच आरोपींकडून पुढील कोणतीही जप्ती बाकी नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, माढा (कोर्ट क्र. 3) यांनी आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व तितक्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. तसेच साक्षीदारांवर दबाव टाकू नये, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आदी अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले.