*AJ 24taas news Maharashtra साठी पंढरपूर/प्रतिनिधी संतोष हालकुडे जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल नंबर 9921581001
पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपाला पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपाचा तिसरा दिवसही कडकडीत पाळण्यात आला. सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूरमधील सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवत शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक तथा कामगार नेते अशोक इंदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले. मंगळवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या १६ प्रमुख मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करणे, रिक्त पदांची तात्काळ भरती करणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये सुधारणा करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात प्रथम लिपिक एस. एम. काळे यांच्यासह प्रवीण तुपसौंदर, प्रदीप सावंत, शिवानंद दनुरे, सचिन बागल, किशोर दिघोळे, के. ए. गोरे, अतुल जाधव, वैभव पंडित, सुदर्शन कांबळे, नानाभाऊ वाळके, योगेश जाधव, अमोल पवार, गणेश मोरे, विक्रांत पाटील, श्रीमती एस. बी. वाघमोडे, उत्कर्ष देशमुख, सचिन देठे, ए. ए. हजारे, नानागौडा बिरादार, अजय पाटील, आनंदा लोखंडे, योगेश हवालदार, एस. व्ही. लवटे, बाबा लवटे, अवधूत वाघमारे, एस. व्ही. हाके, एम. एम. यादव, श्रीमती एस. एस. शिंदे, श्रीमती जे. एस. शेख, एस. जी. बारसकर, एस. एम. साळुंखे, एस. ए. शेख आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, आंदोलनस्थळी कार्यकारी अभियंता अमित निमकर, उपकार्यकारी अभियंता एस. डी. शिंदे, उपविभागीय अभियंता बी. एम. मिटकरे आणि वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी आर. आर. घोप यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राज्यभर सुरू असलेल्या या बेमुदत संपामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक प्रशासकीय कामांवर परिणाम होत असून, शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.





