“चला होऊया संघटित, करूया अन्यायावर प्रहार!” — युवक, शेतकरी व सर्वसामान्यांना साद
टेंभुर्णी/प्रतिनिधी | धनंजय भोसले (AJ24Taas News Maharashtra)
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष कडून संघटन विस्तारासाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर संपर्क प्रमुख अमोल शेठ जगदाळे यांनी युवक, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘प्रहार’ परिवारात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. मा. आ. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे ग्रामीण भागात ‘प्रहार’चे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
“चला होऊया संघटित, करूया अन्यायावर प्रहार!” या घोषणेसह गावोगावी संपर्क मोहीम राबवून नव्या कार्यकर्त्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या ‘प्रहार’ला सर्वसामान्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
‘प्रहार’ ही केवळ राजकीय संघटना नसून शेतकरी, कामगार, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारी चळवळ म्हणून ओळखली जाते. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना च्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळवून देणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच विविध आंदोलनांद्वारे प्रशासनाला जागे करणे, अशी कामगिरी संघटनेने उभी केली आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, समाजकारणाची आवड असणाऱ्या इच्छुकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नेतृत्वगुण असलेले आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची तयारी असलेले युवक ‘प्रहार’मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
“एकच ध्यास, सर्वसामान्यांचा विकास!” या ध्येयाने प्रेरित होऊन अधिकाधिक नागरिकांनी संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन अमोल जगदाळे यांनी केले आहे. आगामी काळात ही मोहीम राजकीय व सामाजिक पातळीवर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
📞 नाव नोंदणीसाठी संपर्क
मा. अमोल शेठ जगदाळे
(संपर्क प्रमुख – धाराशिव व सोलापूर जिल्हा)
📱 मोबाईल: 7020293109





