AJ 24taas news Maharashtra साठी टेंभुर्णी | प्रतिनिधी (धनंजय भोसले) जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल नंबर 9921581001*
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात संघटन विस्ताराचा बिगुल फुंकत जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मा. आ. बच्चुभाऊ कडू (भाऊ) यांच्या आक्रमक आणि लोकाभिमुख नेतृत्वाखाली ‘प्रहार’च्या विचारांनी प्रेरित होत गावोगावी संघटनेचे जाळे भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“चला होऊया संघटित, करूया अन्यायावर प्रहार!”
या घोषवाक्याखाली प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तसेच विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून समाजातील वंचित, शेतकरी, दिव्यांग आणि युवकांना एकत्र आणण्याचा व्यापक प्रयत्न सुरू आहे. लढाऊ, निडर आणि समाजाभिमुख कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी सुरू करण्यात आली असून, या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा–तालुका पातळीवर नेतृत्वाची सुवर्णसंधी
समाजकारणाची आवड, सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता आणि संघटनात्मक काम करण्याची तयारी असलेल्या इच्छुकांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर पदाधिकारी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युवकांना नेतृत्वाची संधी देत त्यांच्यातील क्षमता विकसित करण्यावर ‘प्रहार’चा विशेष भर आहे.
‘प्रहार’ परिवारात सहभागी होण्याचे आवाहन
“एकच ध्यास, सर्वसामान्यांचा विकास!” या ब्रीदवाक्याने प्रेरित होत अधिकाधिक युवक, शेतकरी, महिला व विविध घटकांनी ‘प्रहार’ परिवारात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रहारची ओळख – लढाऊ, जनतेसाठी कटिबद्ध
‘प्रहार’ हा केवळ राजकीय पक्ष नसून तो सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारी चळवळ म्हणून ओळखला जातो. अन्यायाविरोधात ठाम भूमिका, दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज, तसेच प्रशासनाला धारेवर धरण्याची शैली यामुळे ‘प्रहार’ने राज्यात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
☎️ नाव नोंदणीसाठी संपर्क
मा. अमोल शेठ जगदाळे
(संपर्क प्रमुख – धाराशिव व सोलापूर जिल्हा)
📞 मोबाईल: 7020293109
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात ‘प्रहार’ची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम आगामी काळात राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठा प्रभाव निर्माण करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.





