टेंभुर्णीत भगवा झेंडा चौक व झुंजार ग्रुपचा वतिने शिवजयंती साजरी

IMG-20260221-WA01851.jpg

**************************
टेंभुर्णी प्रतिनिधी AJ 24taas news Maharashtra साठी धनंजय भोसले*

**********************************
टेंभुर्णी येथे भगवा झेंडा चौक व झुंजार ग्रुपच्या वतीने शिवजयंती सालाबादप्रमाणे साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अध्यक्ष संजय भिकाजी जाधव व उपाध्यक्ष शंकर नामदेव सुक्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून छत्रपतीच्या नावाच्या जयघोष व घोषणा करीत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली तसेच शिवजयंती निमित्त 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री दहा ते बारा या वेळेस स्वर संवाद ग्रुप मराठी गीताची सुमधुर मैफिल संपन्न झाला तसेच 18 ते 19 या तारखेला सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत शिवकालीन प्रदर्शन शस्त्र प्रदर्शन, शिवाजी महाराजांच्या काळातील विविध बंदुकी, तोफा, दारूगोळे, चिलखत तसेच ढाल संभाजी महाराजांचे शिवकालीन पत्र व शिवकालीन अनेक असंख्य वस्तूचे भव्य व दिव्य प्रदर्शन ठेवण्यात आले तसेच दोन दिवस टेंभुर्णी शहरातील सर्व विद्यालया स्कूल विविध संघटनेचे पदाधिकारी व माढा तालुक्यातील सर्व नागरिक प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते तसेच शिवजयंती निमित्त 18 तारखेला झुलवा पाळणा रात्री बारा वाजता विविध महिला यांचे उपस्थित साजरा करण्यात आला तसेच 19 फेब्रुवारी 2026 रोजी आठ ते दहा या वेळेत झी टॉकीज फेमस भारुड रत्न हे.भ.प. श्रीकृष्ण महाराज जोगदंड कामखेडा (लातूर) येथून आणले होते तसेच शिवजयंतीनिमित्त भारुड च्या माध्यमातून नवीन पिढीला नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करू व्यसनापासून दूर राहण्यासाठी भारुड चा माध्यमातून विविध सोंग विविध प्रकारचे नाटक असे अनेक भारुड करण्यात आले व 19 फेब्रुवारी 2026 रोजी गायिका अनारकली कारळे यांनी शिव गीते सायंकाळी सहा ते आठ वेळेस गायले व शिवगीतातून शिवाजी महाराजांच्या विविध कलागुणांना आपल्या गाण्यातून बोल गायले तसेच अशाप्रकारे भगवा झेंडा चौक व झुंजार ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा 2026 टेंभुर्णीतील व माढा तालुक्यातील जनतेला एक वेगळा संदेश देणारा सोहळा ठरला