उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या उपस्थितीत टेंभुर्णीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

3.jpg

AJ 24taas News Maharashtra / टेंभुर्णी प्रतिनिधी – धनंजय भोसले
जाहिरातीसाठी संपर्क : 9921581001

टेंभुर्णी (प्रतिनिधी) : दरवर्षी ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त टेंभुर्णी व परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन टेंभुर्णी, टेंभुर्णी डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब टेंभुर्णी आणि इनरव्हील क्लब टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता टेंभुर्णी येथील रोटरी क्लब हॉल (शासकीय विश्रामगृहाजवळ) येथे होणार आहे. या कार्यक्रमात टेंभुर्णी व परिसरातील विविध क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित गौरव व सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS) उपस्थित राहणार असून त्या महिलांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अकलूज येथील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ संघटनेच्या संस्थापक डॉ. वंदना गांधी आणि सामाजिक कार्यकर्त्या व लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या संस्थापिका सौ. ललिता कोळवले या देखील विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास टेंभुर्णी व परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मदन कांबळे, डॉ. अमित चोपडे, डॉ. लालासाहेब शेंडगे, डॉ. विशाल जाधव, दीपक व्यवहारे, संदीप मोकाशी, संतोष तांबडे, सविता कोकाटे व स्वरुपा बोबडे आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.