*AJ 24taas news Maharashtra साठी टेंभुर्णी प्रतिनिधी धनंजय भोसले*
जाहिरात साठी संपर्क 9921581001
टेंभुर्णी (प्रतिनिधी) : चव्हाणवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजात आदर्श निर्माण करत अनेक वर्षे एकत्रित कुटुंब पद्धत यशस्वीपणे चालवणाऱ्या वैजंता विश्वनाथ खडके, सौ. शोभा अशोक नांगरे, सौ. विमल नरहरी नांगरे व अलका रामचंद्र जाधव या चार कुटुंब प्रमुखांचा सरपंच स्वाती चव्हाण यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी चव्हाणवाडी गावच्या पोलीस पाटील लक्ष्मी इंदलकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य साळुबाई मोठे, ज्योती इंदुलकर पाटील, संजीवनी आरबोले, बाळूमामा ट्रस्टच्या अध्यक्षा विमलताई नांगरे, रोहिणी जाधव, छाया साळुंखे, पूजा खरात, वृषाली खडके, सुतार मॅडम तसेच बचत गटाच्या एस.आर.पी. परवीन काझी व टेंभुर्णी परिसरातील बचत गटाच्या सचिवा शितल गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच कमी क्षेत्रात शेती करून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या रूपाली सचिन मुळे व अश्विनी ज्योतीराम पवार यांनाही विशेष गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना सरपंच स्वाती चव्हाण म्हणाल्या की, आपल्या गावातील कर्तृत्ववान व होतकरू महिलांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. अनेक महिलांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीही गावची महिला सरपंच म्हणून पुढील काळात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी वृषाली खडके व सौ. गीता सलगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला चव्हाणवाडी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रातील तरुण वर्ग, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी केले तर सरपंच प्रतिनिधी हनुमंत चव्हाण यांनी आभार मानले.





