AJ 24taas news साठी पिलीव (प्रतिनिधी- प्रमोद भैस) जाहिरात साठी संपर्क मोबाईल नंबर 9921581001
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता पाचवीच्या तब्बल दहा विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ३०० पैकी उल्लेखनीय गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सार्थक युवराज नरुटे (२७७), अक्षर औदुंबर गोडसे (२६४), अभिराज गणेश देशमुख (२५१), हर्ष सुहास कोल्हे (२५०), श्रीराम सतीश काकडे (२४८), विघ्नेश विनोद तावरे (२४४), विराज अंबादास गुजरे (२४३), सानिका ब्रह्मदेव जाधव (२३६), वेणुगोपाल श्रीकांत आर्वे (२०१) आणि वृषांक वैभव मेथवडे (१८४) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सैनिक स्कूल परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सुप्रिया पांगे आणि मुख्याध्यापक यांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माळशिरस तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, प्रभारी केंद्रप्रमुख राजकुमार फासे, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, शिक्षकवृंद तसेच पिलीव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले.





