पिलीव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या तब्बल सात विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत निवड.

IMG-20260320-WA0019.jpg

AJ 24taas news साठी पिलीव प्रतिनिधी/ प्रमोद भैस जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल 9921581001

नवोदय विद्यालय समितीच्या वतीने 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश पात्रता परीक्षेत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिलीव या शाळेतील इयत्ता पाचवीतील तब्बल ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी चि.हर्ष सुहास कोल्हे, चि.कल्पेश प्रवीण वाघमारे, चि.सार्थक युवराज नरुटे,कु. ईश्वरी नितीन मगर, कु.प्रणाली विजय लोखंडे, कु.अक्षरा औदुंबर गोडसे आणि कु.सानिका ब्रह्मदेव जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती सुप्रिया विजयकुमार पांगे – देशमुख मॅडम यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचेही मार्गदर्शन लाभले.

तालुक्यात, जिल्ह्यात, नव्हे राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच शाळेतील विद्यार्थी नवोदयसाठी पात्र होणारी शाळा झाल्याबद्दल या विद्यार्थ्यांची व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सुप्रिया पांगे देशमुख मॅडम यांचे माळशिरस तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मॅडम, केंद्रप्रमुख राजकुमार फासे सर, शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार साळुंखे सर तसेच सर्व शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गांधी, उपाध्यक्ष प्रियंका रजपूत व सर्व सदस्य,पालक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.