AJ 24taas news Maharashtra साठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर टेंभुर्णी
जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल नंबर 9921581001
टेंभुर्णी प्रतिनिधी —
माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे सत्ताधारी पदावर असलेल्या महिला सरपंचांवरच नात्यातील व्यक्तीकडून निर्घृण हल्ला झाल्याची संतापजनक व धक्कादायक घटना १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अर्चना रवींद्र श्रीखंडे व त्यांचे पती, माजी उपसरपंच रवींद्र श्रीखंडे हे आपल्या शेतातील सुरू असलेल्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेले असता, त्यांचा पुतण्या सचिन हनुमंत श्रीखंडे याने अचानक तेथे येऊन वाद उकरून काढत आक्रमक पवित्रा घेतला. क्षणातच वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले आणि आरोपीने रवींद्र श्रीखंडे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना पाहून पतीला वाचविण्यासाठी धावून गेलेल्या सरपंच अर्चना श्रीखंडे यांनाही आरोपीने कोणतीही पर्वा न करता तेथेच पडलेल्या काठीने डाव्या हाताच्या मनगटावर तसेच पोटरीवर वार करून जखमी केले. यानंतर आरोपीने दोघांनाही अश्लील शिवीगाळ करत “तुम्हाला बघून घेतो” अशी उघड धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या गंभीर घटनेनंतर जखमी अवस्थेत असतानाही सरपंच अर्चना श्रीखंडे यांनी धैर्याने पुढाकार घेत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. सदर प्रकरणाचा तपास ए.एस.आय. बिरुदेव हजारे करीत असून, आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.





