AJ 24taas news/अनिल जगताप पत्रकार टेंभुर्णी मोबाईल नंबर 9921581001
टेंभुर्णी : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या १९४ व्या पुण्यतिथीनिमित्त टेंभुर्णी शहरातील शिवकालीन खंडोबा मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटना, झुंजार, हिंदवी स्वराज्य, भगवा झेंडा ग्रुपच्या युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष अंकुश जाधव सर व टेंभुर्णीतील युवा उद्योजक सुजित राजमाने यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अंकुश जाधव सर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.
ते म्हणाले, भारतावर इंग्रजांचे राज्य असताना जनतेमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. ही दहशत मोडून काढत इंग्रजांविरोधात बंडाचे पहिले सशस्त्र पाऊल टाकणारे आद्य क्रांतिवीर म्हणून राजे उमाजी नाईक यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरोधात संघर्ष उभारला.
राजे उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी झाला असून, ३ फेब्रुवारी १८३२ रोजी त्यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मदने यांनी केले.
यावेळी सुजित राजमाने, दीपक जाधव, संतोष काळे, रमेश तिपाले, बापू माने, अजित पवार गटाचे स्टार प्रचारक सोलापूर जिल्हा दत्ताभाऊ जाधव, शरद गुजले, गणेश यादव, लक्ष्मण मदने, ओंकार मदने, आशलेश घाडगे, सचिन सुक्रे, गणेश मदने, साहिल तांबोळे, ऋषी कांबळे, ओंकार राजमाने, अजित कांबळे, आप्पा मदने, सुरज जाधव, अजित देशमुख, यश गुजले आदी मान्यवर उपस्थित होते.





