शेळी-बोकड चोरीचा टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

goats-4-640.jpg

AJ 24taas news Maharashtra

टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, पुन्हा एकदा अज्ञात चोरट्यांनी शेळी आणि बोकडावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 32/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर घटना अशी आहे की, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.00 वाजता ते 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2.45 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरासमोरील मोकळ्या जागेतून शेळ्या व बोकडे चोरून नेले. चोरीस गेलेल्या मालामध्ये भगवान ढवळे यांच्या एक काळपट-पांढऱ्या रंगाची शेळी व एक काळ्या रंगाचा बोकड (अंदाजे किंमत 20,000 रुपये) तसेच शहाजी कल्याण ढवळे यांच्या मालकीच्या एक चॉकलेटी रंगाची चट्टेपट्टे असलेली शेळी, एक काळ्या रंगाचा बोकड व एक चॉकलेटी रंगाचा पाट (अंदाजे किंमत 25,000 रुपये) असा एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. संबंधित प्रकरणी फिर्यादी भगवान सुग्रिव ढवळे (वय 40, व्यवसाय शेती), रा. साईराज पेट्रोल पंपाशेजारी, सापटणे (टे), ता. माढा, जि. सोलापूर यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ वाघमारे करीत आहेत.

तसेच टेंभुर्णी परिसरात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व सर्वसामान्य वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.