श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260121-WA0055.jpg

मौजे अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च टेंभूर्णी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित पालक-शिक्षक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालक प्रतिनिधी श्री. मारुती किरवे व सौ. बबिता वीर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मौल्यवान विचार मांडले. प्रा. शिवराज ढगे यांनी संस्थेची प्रगती, शैक्षणिक उपक्रम व इतर माहिती सादर केली. तसेच पालकांनी आपल्या सूचना मांडल्या, ज्याची दखल घेण्याचे आश्वासन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिले.
फार्माकॉलॉजी विभागप्रमुख डॉ. सचिन सकट यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे,अध्यक्ष ॲड विजयराव हिरवे व उपाध्यक्ष बाबा येडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव शिंदे यांनी केले, तर समन्वयक डॉ. प्रशांत मिसाळ होते.