शिवाजी पाटील चांदजकर यांची ‘शिवरत्न’ बंगल्यावर भेट; शिंदे घराण्याला धक्का, टेंभुर्णी गटात बंडाची ठिणगी?

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

kmc_20260121_004749.png

टेंभुर्णी / प्रतिनिधी :
टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील राजकारण सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपले असून, भाजप व शिंदे गटासाठी अडचणी वाढताना दिसत आहेत. कोंढार भागातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले शिवाजी पाटील चांदजकर यांनी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या ‘शिवरत्न’ बंगल्यावर दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीकडे शिंदे घराण्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, टेंभुर्णी गटात बंडखोरीची ठिणगी पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

ओबीसी महिला राखीव जागेसाठी शिवाजी पाटील चांदजकर यांच्या पत्नी अंजनादेवी शिवाजीराव पाटील चांदजकर यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे असताना, उमेदवारी डावलली जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने असंतोष उफाळून आला आहे. उमेदवारी नाकारल्यास थेट बंडखोरीचा मार्ग स्वीकारण्याची तयारी असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे.

शिवाजी पाटील चांदजकर हे केवळ राजकीय वक्तव्यांपुरते मर्यादित नेते नसून, विकासकामांच्या जोरावर जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मागील जिल्हा परिषद कार्यकाळात बबनदादा शिंदे व रणजित शिंदे यांच्या पाठबळावर जिल्हा परिषदेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी टेंभुर्णी गटात विकासकामांचा वेग लक्षणीयरीत्या वाढवला.

अप्पर तहसील कार्यालयासाठी केलेला संघर्ष, आढेगाव पाटी–टाकळी रस्ता, चांदज–टणू पूल, वीजपुरवठा सुधारणा, नवीन डी.पी. मंजुरी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट पंचनामे तसेच खरेदी-विक्री संघातील सक्रिय भूमिका — या सर्व कामांमुळे शिवाजी पाटील चांदजकर यांचा जनसंपर्क भक्कम झाला आहे. कोंढार भागातील प्रत्येक वाडी-वस्तीशी त्यांचा थेट संबंध असून, संकटात धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

या पार्श्वभूमीवर अंजनादेवी पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यास टेंभुर्णी जिल्हा परिषद गटाची जागा भाजपसाठी धोक्यात येण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजी पाटील चांदजकर यांची ‘शिवरत्न’ बंगल्यावर झालेली उपस्थिती ही केवळ औपचारिक भेट नसून, भविष्यातील राजकीय समीकरणांचा स्पष्ट इशारा मानला जात आहे.

टेंभुर्णी गटातून उसळलेली ही असंतोषाची ठिणगी उद्या संपूर्ण माढा तालुक्यात भाजपविरोधी बंडाचे लोण पसरवू शकते. एकाच वेळी अनेक ठिकाणी बंडखोरी झाली तर भाजप व शिंदे गटाची निवडणूक गणिते पूर्णपणे कोलमडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीं