आठ दिवसांत दोन लाख नागरिक देतात भेट
टेंभूर्णी (प्रतिनिधी) अनिल जगताप पत्रकार टेंभुर्णी मोबाईल नंबर 9921581001
**********************************
माढा तालुक्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ओळख असलेल्या टेंभुर्णीतील बहुजन प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही “टेंभूर्णी फेस्टिव्हल २०२६” चे ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या काळात या भव्य सांसकृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टिवलचे संयोजक व अध्यक्ष रघुनाथ वाघमारे व संतोष वाघमारे यांनी दिली.
फेस्टिव्हलचे यंदाचे यशस्वी सलग २२ वे वर्ष असून हा महोत्सव टेंभुर्णी शहरासह संपूर्ण माढा तालुक्यातील नागरिकांचे मुख्य आकर्षण बनला असून आठ दिवसामध्ये जवळपास दीड लाख लहान थोर नागरिक भेट देतात यामध्ये कला,ज्ञान, विद्यान, मनोरंजन, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, सामाजिक प्रबोधनपर, अंधश्रधानिर्मुलन यावर आधारित प्रदर्शन, कार्यक्रमामध्ये
दि ७. गायन स्पर्धा लहान गट
दि ८ . डान्स स्पर्धा
दि ९. गायन स्पर्धा मोठ गट
दि .१० भजन स्पर्धा
दि . ११ तबला वादन स्पर्धा
दि. १२ . फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आर्केष्ट्रा लावण्या, भारुड, लेझीम, वाघ्या मुरुळी या कार्यक्रमाबरोबरच एकेरी डान्स स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर नागरिकांच्या व बाळगोपाळांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा, दोन मारुती कारचा मौत का कुवा, बैंक इस पन्नालाल, सत्यम्बी चांदतारा, टोराटोरा, मिनी ट्रेन पैरकला, जादूचे प्रयोग इत्यादी साधने उभारण्यात येणार आहेत. हॉटेल्स व महिलांच्या खरेदीसाठी ज्वेलरी, संसार उपयोगी वस्तू लहान मुलांची खेळणी यांची १०० भव्य दुकाने उभारले जाणार आहेत. तसेच गृह उपयोगी वस्तू व कृषी उपयोगी अवजाराचे प्रदर्शनही या मध्ये आहे. तर खव्वय्यासाठी चायनिज,पावभाजी,मंच्युरियन,शोरमा,पिझ्झा,बि-याणी यासह विविध खाद्यपदार्थाचे ५० स्टॉल लावण्यात येणार आहेत. कुर्डुवाडी रोडवरील भव्य मैदानात हा महोत्सव पार पडणार असून नियोजनाला प्रारंभ झाला आहे.बहुजन प्रतिष्ठान मार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजवर मूणत माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव, अॅड. भास्करराव आव्हाड, साहित्यिक डॉ. आनंद यादव यासारखे विचारवंत भेट देऊन गेलेले आहेत. गेल्या तीन वर्षापासून सिने क्षेत्रातील कलावंत उद्घाटनासाठी हजेरी लावत आहेत.. प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संस्थापक रघुनाथ वाघमारे. अध्यक्ष संतोष वाघमारे, विकास सुर्वे,गणेश पोळ, गणेश चौगुले,सोमनाथ नलवडे,हरिशचंद्र गाडेकर,धनंजय भोसले, झुंबर जाधव, योगेश दाखले, चंद्रकांत कुटे, पोपट सरडे,शरपुद्दीन मुलाणी,समाधान बोराटे, अशपाक तांबोळी, विनोद आखाडे,दशरथ कसबे, रोहिदास वाघमारे, सुनील जगताप, समाधान लोंढे,बाळू मोरे इ. कार्यकर्ते परिश्रम आहेत. अधिक माहितीसाठी संतोष वाघमारे (९८२०१०८२१०) यांचेशी संपर्क साधन्याचे अहवान करण्यात आले आहे.
टिप
बातमी मध्ये आकाश पाळण्याचा फोटो घ्यावा.





