कन्हेरगाव येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी .

IMG-20260201-WA0061.jpg

कन्हेरगांव दि प्रतिनिधी धनंजय मोरे

AJ 24taas news Maharashtra

कन्हेरगाव तालुका माढा येथील चर्मकार समाज मंदिरात रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच श्रीकांत बनसोडे, कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे व ग्रामपंचायत सदस्या पद्मजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य गणेश माने, जोतीराम कांबळे, आशा शिंदे, राणी बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पूनम कांबळे, स्वाती कांबळे, कल्पना लोंढे, राजेंद्र शिंदे, दमयंती कांबळे, रेखा मस्के, मनिषा आयरे, तुकाराम शिंदे, रूपचंद कांबळे, ज्योतीराम भंडारे, यल्लाप्पा सोनवणे, नवनाथ सोनवणे,नवनाथ भाग्यवंत, लक्ष्मण भंडारे, देविदास जाधव, शिवाजी जाधव, रोहिदास जाधव , जनार्दन सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. समाजात समता, बंधुता व सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी संतांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जयंती कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.