*AJ 24taas news Maharashtra साठी टेंभुर्णी अनिल जगताप (पत्रकार)मोबाईल नंबर 9921581001*
येथील एस व्ही एस कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजच्या डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच स्थानिक संजीवनी हॉस्पिटल इंदापूर ला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष रुग्णालयातील कामकाजाचा अनुभव देणे हा होता.
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील विविध विभाग, जसे की- आयसीयू (ICU), ऑपरेशन थिएटर (OT), ओपीडी (OPD) आणि विशेषतः ‘हॉस्पिटल फार्मसी’ विभागाची पाहणी केली. रुग्णालयातील औषध वितरक रुग्णांना औषधे कशी देतात, औषधांची साठवणूक कशी केली जाते आणि रुग्णालयातील इतर विभागांशी समन्वयात्मक कामकाज कसे चालते, याची माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली.
रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हॉस्पिटल फार्मसीमध्ये औषधे उत्पादक कंपन्यांकडून रिटेल मेडिकल व्यावसायिकांपर्यंत कशी पोहोचतात आणि औषधांची साठवणूक अल्फाबेटिक किंवा कंपनीनुसार कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल फार्मसी, औषधांची सुरक्षितता आणि रुग्णांच्या सेवेतील फार्मासिस्टची भूमिका समजण्यास मदत झाली.
शैक्षणिक भेट यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.राजेंद्र ठोंबरे आणि कॉलेज चे प्राचार्य श्री.कृष्णात ढेकळे, डॉक्टर.नेहा काजळे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्माचारी उपस्थित होते.





