एस. व्ही. एस. कॉलेजची गोविंद वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांतून सामाजिक भान जोपासले

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260202-WA0041.jpg

टेंभुर्णी | प्रतिनिधी :
टेंभुर्णी येथील एस. व्ही. एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या वतीने गोविंद वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देण्यात आली. ‘युवा पिढी आणि सामाजिक बांधिलकी’ या उपक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, सुख-दुःखाच्या आठवणी विद्यार्थ्यांनी आपुलकीने ऐकून घेतल्या. केवळ संवादापुरतेच न थांबता, विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेटमनीतून निधी जमा करून वृद्धाश्रमासाठी आवश्यक वस्तूंची मदत केली.

यामध्ये साखर, पोहे, डाळ, बिस्कीट, शेंगदाणे यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. तसेच सर्व वृद्धांना ताजी फळे व अल्पोपहार देण्यात आला. वृद्धाश्रमातील ग्रंथालयासाठी धार्मिक व प्रेरणादायी पुस्तकेही भेट देण्यात आली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक राजेंद्र ठोंबरे, संस्थेचे प्राचार्य श्री. कृष्णात ढेकळे, डॉ. नेहा काजळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. ऐश्वर्या सरवदे, प्रा. भाग्यश्री घाडगे, प्रा. अभिषेक घागरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून, वृद्धांच्या सहवासातून संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित झाले.