*टेंभुर्णी प्रतिनिधी. धनंजय भोसले AJ 24taas news*
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. पिंपळनेर गंगामाई नगर या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून आले.
चव्हाणवाडी येथील मिस्कीन पार्टीचे प्रमुख अशोक मिस्कीन हे माजी आमदार बबनदादा शिंदे व शिंदे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिल्याने व मिस्कीन यांच्यावर शिंदे कुटुंबाचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी या कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड केली होती. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी चव्हाणवाडी सारख्या छोट्याशा गावांमधून आपले विश्वासू अशोक मिस्किन यांना कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड केल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यांचे ठीक ठिकाणी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना संचालक अशोक मिस्किन मनाले की विठ्ठलराव शिंदे कारखाना जिल्ह्यातील एकमेव कारखाना आहे की प्रत्येक वर्षी दहा दिवसाला ऊस सभासदांच्या खात्यावर उसाचे बिल जमा करणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. या कारखान्यावर ऊस सभासदांनी दाखवलेला विश्वास कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बबनदादा शिंदे कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही हा कारखाना म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचा कारखाना म्हणून याकडे पाहिले जाते कारखान्याच्या माध्यमातून माढा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार मुलांना या ठिकाणी रोजगार मिळाला असून सध्या या कारखान्याचे उच्चांकी गाळप झाले आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे, यांनी तालुक्यामध्ये कधीही गटातटाचे राजकारण न करता तालुका सुजलाम सुफलम करण्याकडे जास्त भर दिला. असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.





