एस. व्ही. एस. कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सव उत्साहात

IMG-20260220-WA0091.jpg

AJ 24taas news Maharashtra


दि. 19 फेब्रुवारी रोजी एस. व्ही. एस. कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिवभक्तीचा जागर केला. कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, पोवाडा, नाट्य सादरीकरण, लाठी-काठी व तलवारबाजीचे खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सादरीकरणातून महाराजांचे शौर्य, शिस्तबद्धता आणि स्वराज्यनिर्मितीचा इतिहास प्रभावीपणे उलगडण्यात आला.

या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक युद्धकलेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार, संस्थापक राजेंद्र ठोंबरे, प्राचार्य श्री. कृष्णात ढेकळे, डॉ. नेहा काजळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच टेंभुर्णी मध्यवर्ती शिवजन्म उत्सव सोहळा समितीचे सहकार्य लाभले. आयोजनाची धुरा प्रा. रेणुका देशपांडे व प्रा. ऐश्वर्या सरवदे यांनी समर्थपणे सांभाळली.