ट्विंकल स्टार स्कूल मध्ये शिवजयंती साजरी

Screenshot_2026-02-20-11-28-29-28_7352322957d4404136654ef4adb64504.jpg

AJ 24taas news Maharashtra

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विलास गुंड, ज्येष्ठ व्यावसायिक माणिकचंद कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य आप्पा हवालदार हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे, बोबडे गट प्रमुख ऋषिकेश बोबडे, भांड्याचे व्यापारी महेश कोकीळ, बहुजन मुक्ती पार्टीचे माढा लोकसभा अध्यक्ष महेंद्र सोनवणे, सादिक तांबोळी, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संतोष खैरमोडे, संदीप साळवे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी ऋषिकेश बोबडे, महेंद्र सोनवणे, संस्थापक प्रा.हरिश्चंद्र गाडेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय भोसले, संदीप साळवे, रेखा गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अर्चना गाडेकर, मनीषा सोनवणे, स्वप्नाली भोसले, स्वप्निल गाडेकर, धनंजय भोसले, एलिना साळवे, वरद शिरसागर, आकाश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.