सैफ शरीफ काझी याचा पहिला रोजा; शांतता व ऐक्याचा संदेश

IMG-20260225-WA0067.jpg

AJ 24taas News साठी / धनंजय भोसले, टेंभुर्णी

टेंभुर्णी प्रतिनिधी : पवित्र रमजान महिन्यात रोजा पाळण्यास इस्लाम धर्मात विशेष महत्त्व आहे. टेंभुर्णी येथील सैफ शरीफ काझी या चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा श्रद्धा, संयम आणि उत्साहाने पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सैफने पहाटे ५:३४ वाजता सहेरी करून रोजाची सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण दिवस अन्न-पाण्याचा त्याग करत सुमारे १३ तास उपवासाचे पालन केले. सायंकाळी ६:३७ वाजता इफ्तार करून त्याने रोजा सोडला.

विशेष म्हणजे सैफची आई पोलीस सेवेत कार्यरत आहे. शिस्त, कर्तव्य आणि समाजसेवेची जाणीव घरातूनच मिळालेल्या संस्कारांमुळे सैफने लहान वयातच धार्मिक आचरणातून संयम आणि जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे, असे परिसरात बोलले जात आहे.

रोजा सोडताना सैफने अल्लाहकडे देशात शांतता, बंधुभाव आणि सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द नांदावे, अशी दुआ केली. त्याच्या या कृतीतून सर्वसामान्य नागरिकांनाही तसेच धार्मिक बांधवांनाही एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश मिळत असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

सैफ शरीफ काझीच्या या पहिल्या रोजाबद्दल त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.