AJ 24taas news Maharashtra
टेंभुर्णी प्रतिनिधी/धनंजय भोसले
बातमी साठी संपर्क करा मोबाईल 9921581001
येथील सुप्रसिध्द ग्रामीण कवी, लेखक हरिश्चंद्र पाटील यांना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगरचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्रदान.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा
राजगुरुनगरचा नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार अंतर्गत दिला जाणारा २०२५ सालचा कै. शंकर पाटील स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार हरिश्चंद्र पाटील यांच्या ‘खरा वारस’ या कथासंग्रहास नुकताच प्रदान करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण आदर्श गाव हिवरे बाजार येथे आदर्श सरपंच मा. पोपटराव पवार, अ. भा. म. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ कवी मा. विठ्ठल वाघ, मा. पुरुषोत्तम सदाफुले, म. सा. प. चे अध्यक्ष संतोष गाढवे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
साहित्य लेखनाच्या माध्यमातून ग्रामसंस्कृती आणि तळागाळातल्या कष्टकऱ्यांच्या जगण्यातील सुख, दुःख, वेदना मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हरिश्चंद्र पाटील यांनी आपल्या सकस साहित्य लेखनातून केले आहे. हुंदके मातीचे – काव्यसंग्रह तर संस्कारफुले, शिरवाळ, हंबर, ओवाळणी, खरा वारस, मामाचा गाव, सोन्याचा दगड हे कथासंग्रह अशी त्यांची आठ पुस्तकें प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांना आजपर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पाटील यांच्या पुस्तकासह काव्य स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, कथालेखन स्पर्धा इत्यादी मिळून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सदर कै. शंकर पाटील स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार मिळालेबद्दल हरिश्चंद्र पाटील यांचे साहित्य क्षेत्रातील लेखक, साहित्य प्रेमी मित्र यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.





