कृषी कन्यांकडून शेतकऱ्यांना बँक कर्जाचे मार्गदर्शन

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

Screenshot_2026-01-03-19-47-13-44_7352322957d4404136654ef4adb64504.jpg

टेंभुर्णी प्रतिनिधी/ हरिश्चंद्र गाडेकर सर

****************”**”********”**

लवंग ,ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांर्गत कृषी कन्यांकडून गावातील शेतकऱ्यांसाठी बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बँक दस्तऐवजांची माहिती देणे आणि व्यवहारिक मार्गदर्शन देणे हा आहे. कृषी कन्यांनी शेतकऱ्यांसमोर उदाहरणाद्वारे दाखवले की, बँक कर्जासाठी अर्ज तयार कसा करायचा ? आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? व बँक कर्ज मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो ? शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास, माहिती दिल्यास कर्ज मिळवणे अधिक सुलभ होते आणि शेतकऱ्यांना सहकार्य होते. या कार्यक्रमासाठी कृषीकन्या वैष्णवी शेळके, सीमा सातपुते , गौरी होले , वैष्णवी खाडे , ऋतुजा पवार , प्राजक्ता जाधव , प्रेरणा पवार , साक्षी डोंबाळे यांनी उपक्रमातून व्यवहारिक अनुभव मिळवला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील , प्राचार्य आर. जी. नलावडे , कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे , कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.एम. चंदनकर , प्रा. एच. व्ही. खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.