AJ 24taas news Maharashtra/अनिल जगताप टेंभुर्णी पत्रकार मोबाईल नंबर 9921581001
टेंभुर्णी-राझंणी येथील युवक कार्यकर्ते संदिप माने यांची राष्ट्रवादी युवक काॅग्रेस (श.प) पक्षाच्या माढा युवक विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माने यांना निवडीचे पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत खा.धैर्यशील मोहिते-पाटील आ.अभिजीत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे, पक्ष संघटन वाढीसाठी समाजातील तळगळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे एकनिष्ठपणे काम करेन,असे मत संदिप माने यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, रावसाहेब देशमुख, टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





