कन्हेरगावच्या कार्तिकी चव्हाणचे एनएमएमएस परीक्षेत यश.

Screenshot_2026-02-28-16-21-21-76_7352322957d4404136654ef4adb64504.jpg

कन्हेरगाव/. प्रतिनिधी धनंजय मोरे AJ 24taas news Maharashtra

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत कन्हेरगाव (ता. माढा) येथील कु. कार्तिकी संभाजी चव्हाण हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेत कार्तिकी हिने १७९ पैकी १३५ गुण मिळवत आपले यश निश्चित केले. ती न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थिनी असून शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अतिरिक्त सराव, जुन्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन यावर तिने विशेष भर दिला.
तिच्या या यशामागे विभागप्रमुख आर. आर. पवार, एस. बी. मोटे, जरीता चव्हाण व पोपट मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक बाळासाहेब चव्हाण, मुख्याध्यापक एस. डी. रोकडे, कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, उद्योजक सतीश हांडे तसेच पालक संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब खोचरे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्तिकी चव्हाण हिच्या या यशामुळे कन्हेरगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.