ट्विंकल स्टार स्कूलच्या वतीने धनंजय भोसले यांचा सत्कार

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260103-WA0039.jpg

टेंभुर्णी (प्रतिनिधी) हरिश्चंद्र गाडेकर सर

*********************************

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी यांच्या वतीने शाळेचे कॉर्डिनेटर धनंजय भोसले यांची टेंभुर्णी शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार पोपट भोसले व संजय कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सत्कारला उत्तर देताना धनंजय भोसले म्हणाले की शाळा हे विद्येचे माहेरघर असते. सुजाण भारताचे उद्याचे प्रतिष्ठित नागरिक बनविण्याचे शाळा मुख्य स्त्रोत आहे. शाळा घडविण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणीवर आपण सर्वांनी मिळून मात केली तर शंभर टक्के विद्यार्थ्यांचा विकास साधता येतो. संस्थेने माझा सन्मान केल्याबद्दल शाळेचे सर्वेसर्वा गाडेकर फॅमिलीचा मी नेहमी ऋणी असेन. यावेळी गगनगिरी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पोपट भोसले, उद्योजक संजय कोठारी, आमचे मार्गदर्शक सादिक तांबोळी, संस्थेचे अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गाडेकर, प्रिन्सिपल रेखा गाडेकर यांनी उपस्थित राहून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.