लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर येथे सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260103-WA0035.jpg

टेंभुर्णी/प्रतिनिधी धनंजय भोसले

********************************


टेंभुर्णी : लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, टेंभुर्णी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून त्यांच्या जीवनकार्याचा सविस्तर उलगडा केला.
सामाजिक परिवर्तन, स्त्री शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंध, केशवपन प्रथा, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच उच्चनीच भेदभाव न मानणे अशा विविध सामाजिक विषयांवर विद्यार्थिनींनी परखड विचार मनोगतांतून मांडले.
याप्रसंगी कोठावळे मॅडम व कोकाटे मॅडम यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र, विचारधारा आणि मानवी जीवनात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व सचिवा सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास संचालिका सौ. शाहिदा पठाण, नितीन शिंदे, प्राचार्य विकास करळे, पी.आर.ओ. सागर खुळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.