कृषी कन्यांकडून शेतकरी महिलांना मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे धडे

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20251224-WA00361.jpg

माळशिरस तालुक्यातील लवंग येथे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी कन्यांनी महिला शेतकऱ्यांना पपई पासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
लवंग येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मंगळवारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथे कृषी कन्यांनी भेट दिली . यावेळी त्यांनी गावांमधील महिलांना पपई पासून त्रुटी फ्रुटी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मूल्यवर्धन ही एक कच्च्या वस्तू पासून उच्च गुणवत्तेचे अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी त्याचे स्वरूप बदलण्याची प्रक्रिया आहे. मूल्यवृद्धीमुळे पोषक तत्वे वाढण्यास आणि उत्पादनानंतर होणारे नुकसान कमी करण्यास मदत होते ,असे कृषिकन्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृषी कन्या प्राजक्ता जाधव, गौरी होले, प्रेरणा पवार, ऋतुजा पवार, वैष्णवी शेळके, वैष्णवी खाडे, साक्षी डोंबाळे,सीमा सतपुते
यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील , प्राचार्य आर.जी .नलावडे कार्यक्रम समन्वयक एस. एम .एकतपूरे, कार्यक्रम अधिकारी प्रा . एम. एम चंदनकर प्रा.एच.व्ही खराडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी लवंग गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.