चांदापुरीचे उपसरपंच हनुमंत सरतापेंसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260109-WA00271.jpg

पिलीव प्रतिनिधी (प्रमोद भैस) :
माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या ठोस व विकासाभिमुख नेतृत्वामुळे भाजपमध्ये प्रवेशाची अक्षरशः लाट उसळली आहे. विकासकामांच्या जोरावर विरोधकांचे बुरुज ढासळत असून, गावोगावी भाजपचा झेंडा अधिक बळकट होताना दिसत आहे.

दि. ७ जानेवारी रोजी चांदापुरी गावचे विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब चोरमले, रामदास निकम, संतोष सरक तसेच प्रमुख कार्यकर्ते दिलीप सरक, प्रताप सुळ, मंगेश कोपनर, कमलेश कोपनर, नवनाथ कोपनर, तानाजी जगदाळे व विष्णू चोरमले यांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे चांदापुरी गावात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करताना, “भाजप म्हणजे केवळ पक्ष नाही तर विकासाचे व सुशासनाचे व्यासपीठ आहे,” असे ठाम मत व्यक्त केले.

नवप्रवेशितांनीही भाजपच्या ध्येय-धोरणांवर विश्वास व्यक्त करत, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. माळशिरस तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच असून, आगामी काळात आणखी मोठे राजकीय उलथापालथी होण्याचे संकेत मिळत आहेत.