श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ व आश्रम शाळा परिवारातर्फे टेंभुर्णीतील पत्रकारांचा गौरव

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260112-WA0124.jpg

टेंभुर्णी (प्रतिनिधी):
“पत्रकार हा समाजाचा खरा जागल्या आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायम अग्रभागी राहणारा पत्रकार हा लोकशाहीचा मजबूत चौथा स्तंभ आहे,” असे प्रतिपादन श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा ग्रामपंचायत सदस्य कैलास सातपुते यांनी केले.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून, श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ व आश्रम शाळा परिवार टेंभुर्णी यांच्या वतीने टेंभुर्णीतील सर्व पत्रकारांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
आदर्श मातांच्या विचारांचा वारसा
याप्रसंगी बोलताना सातपुते पुढे म्हणाले की, “राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांनी समाजाला नवी दिशा दिली. अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंती दिनी समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले, हे मी माझे भाग्य समजतो.”
प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या सोहळ्याला टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश चांदगुडे, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदू महासंघाच्या मीडिया सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विष्णू तात्या बिचकुले, सचिव राजेंद्र केदार, खजिनदार अनिल जगताप यांच्यासह अनेक ज्येष्ठ व तरुण पत्रकार उपस्थित होते.
उपस्थित पत्रकार बांधव:
कार्यक्रमाला गणेश पोळ, सदाशिव पवार, संतोष पाटील, डी. एस. गायकवाड, धनंजय मोरे, सुरज देशमुख, महावीर वजाळे, गणेश चौगुले, नाथा सावंत, सोपान ढगे, संतोष वाघमारे, गाडेकर सर, सतीश काळे, गणेश घाडगे, धनंजय भोसले, सचिन होदाडे यांसह विविध वृत्तपत्रांचे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्राचार्या गवळी मॅडम, मुख्याध्यापिका आगावणे मॅडम आणि आश्रम शाळा परिवारातील शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी सातपुते सर यांनी सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.