राज्य निवडणूक आयोगाकडून १२ जिल्हा परिषद १२५पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर५फेब्रुवारीला मतदान ७ फेब्रुवारीला मतमोजणी!

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

Screenshot_2026-01-13-17-42-37-24_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

मुंबई( प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या जिल्हा परिषदांनी ५०टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही. अशा राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५पंचायत समितीच्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर . केल्या आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीच्या सुनावणी दरम्यान केली होती त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने१०. फेब्रुवारी रोजी पर्यंत निवडणुका घेण्यास मुदतवाढ दिली होती मात्र नक्की निवडणुका कधी घ्याव्या किंवा घेऊ नये याबाबत कोणतेही निर्देश दिले नव्हते अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पहिल्या टप्प्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ( कोकण विभाग) , तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा ,सांगली, कोल्हापूर ,सोलापूर, या जिल्हा सह संभाजीनगर, परभणी ,धाराशिव व लातूर. या १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषदांसह १२५पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रम पुढील प्रमाणे
१ जुलै २०२५ मतदार यादी ग्राह्य धरली जाईल
अर्ज दाखल करणे १६ जानेवारी ते २१ जानेवारी
उमेदवारांच्या अर्जाची छाननी २२जानेवारी
अर्ज मागे घेणे २७ जानेवारी
उमेदवारांना चिन्ह वाटप २७ जानेवारी
५ फेब्रुवारीला २०२६ ला मतदान
मतदानाची वेळ सकाळी स ७.३०ते संध्याकाळी५.३०पर्यंत
७ फेब्रुवारी २०२६ ला मतमोजणी

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समिती आहेत त्यांचे आकडेवारी पुढील प्रमाणे : रायगड१५, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग ८, पुणे १३, सातारा ११, सांगली १०, सोलापूर ११, कोल्हापूर ११, छत्रपती संभाजी नगर ९, परभणी ९, धाराशिव ८, व लातूर १० अशा एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका ही१२. जिल्हा परिषदांसोबतच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे