श्रीराज श्रीपती खटके यांचे वयाच्या ३६व्या वर्षी आकस्मिक निधन

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260116-WA0095.jpg

टेंभुर्णी/प्रतिनिधी-अनिल जगताप

AJ 24taas news Maharashtra

अत्यंत धक्कादायक व मनाला वेदना देणारी दुःखद घटना आज घडली आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.०० वाजता श्रीराज श्रीपती खटके (वय ३६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले.

काळाचा महिमा कळणे कठीण आहे. आयुष्याच्या उमेदीच्या काळात श्रीराज यांचे असे अचानक जाणे, हे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

हसतमुख स्वभाव, आपुलकीची वागणूक आणि समाजात चांगली ओळख असलेले श्रीराज खटके यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या जाण्याने प्रत्येक मन हेलावून गेले असून, हे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य झाले आहे.

श्रीराज खटके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचा वेळ व ठिकाण कुटुंबीयांकडून कळविण्यात येणार आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, तसेच या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धैर्य लाभावे, हीच सर्वांची प्रार्थना आहे.