*पिलीव प्रतिनिधी (प्रमोद भैस) *
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील विविध पक्षांतील अनेक नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश कार्यक्रमास माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते, पिलीव भाजप शहराध्यक्ष प्रमोद भैस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोविंद माळी, गोपाळ माळी, सुभाष जाधव, किसन जाधव, संतोष जाधव, सदाशिव माळी, सतीश जाधव, पोपट काळभोर, मोतीराम पवार, विवेकानंद माळी, मनोज माळी, महेश माळी, नीलेश माळी, नवनाथ माळी, ज्ञानेश्वर मगर, तानाजी मोरे, किरण जाधव, स्वप्नील जाधव, सुशांत जाधव, उमेश जाधव व प्रसाद जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
चौकट —
प्रवेशानंतर बोलताना गोपाळ माळी म्हणाले, “सध्या देशात व राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेत असून विकासाला गती मिळत आहे. महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरसचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.”
चौकट —
पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते हे तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून विकासकामे प्रभावीपणे राबवत आहेत. त्यामुळेच माळशिरस तालुक्यातील विविध गावांमधून अनेक पक्षांतील नागरिक व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
— संजय पाटील, चिटणीस, भाजपा माळशिरस मंडल
फोटो कॅप्शन —
माजी आमदार राम सातपुते, मंडल अध्यक्ष नितीन मोहिते व पिलीव शहराध्यक्ष प्रमोद भैस यांच्या उपस्थितीत कुसमोड येथील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश.





