टेंभुर्णी / प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे छात्रवीर छत्रपती संभाजीराजे यांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा रुद्रशंभू प्रतिष्ठानच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा, खुळे वस्ती (टेंभुर्णी) येथे उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. आजच्या युवा पिढीला छात्रवीर संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची नितांत गरज असून त्यातूनच चारित्र्यवान, राष्ट्रनिष्ठ पिढी घडेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय गायकवाड यांच्यासह अक्षय भैया धोत्रे, गणेश खुळे, शंकर नागणे, विनोद देशमुख, जोतीराम बागवाले, गणेश पाटील, गणेश गोंदिल, रुषिकेश भंडारे, प्रशांत खंडागळे, अस्लम तांबोळी, ओंकार पाटील, संकेत पेडगावकर, गजुभाऊ पंडित, सुरज खटके, गणेश मोरे, शुभम मोरे, वैभव पवार, प्रांजल मिरकड, उमेश सटाले, हर्षद मोरे उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका क्षिरसागर मॅडम, बनसोडे सर व शाळेचा सर्व कर्मचारीवर्ग यांचीही उपस्थिती होती.





