दौंड : प्रतिनिधी – समीर सय्यद AJ 24taas news Maharashtra
इंदापूर तालुक्यातील शेळगाव पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे यांना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. वरिष्ठ पातळीवरून पक्षनिष्ठ, सक्रिय आणि संघटनात्मक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेतून तसेच सर्व राजकीय समीकरणे लक्षात घेऊन रणवरे यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे समजते.
शेळगाव–निमसाखर गणामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण असून या गणातून सत्यजीत रणवरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. शेळगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाचे आरक्षण पडले असून या गणातून भाजपकडून सत्यजीत रणवरे हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत.
भाजपचे विविध उपक्रम, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रणवरे हे सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या सक्रिय कार्यशैलीमुळे ते विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून लवकरच सत्यजीत रणवरे यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे





